Widow Pension Scheme Maharashtra Apply 2025 : महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांसाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारकडून एक महत्त्वाची योजना राबवली जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi National Widow Pension Scheme) या योजनेतून विधवा महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिल जात, ज्यामुळे त्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतात.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की, पतीच्या निधनानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कुणावरही अवलंबून राहाव लागू नये. त्यामुळे त्यांना दरमहा निश्चित रक्कम पेन्शन स्वरूपात मिळते, जी त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवते आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना उभ राहण्यास मदत करते.
ही योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व पात्रता निकष आहेत. अर्जदार विधवा महिलेच वय 40 ते 70 वर्षांदरम्यान असाव लागत. पतीच्या मृत्यूचा दाखला तसेच मोठ्या मुलाच वय 18 वर्षांखाली असलेला दाखला आवश्यक आहे. याशिवाय अर्जदार किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्राची रहिवासी असावी लागते.
अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, रहिवासी दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. एकदा अर्ज मंजूर झाला की लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपयांची पेन्शन थेट बँक खात्यात जमा होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतु केंद्राशी संपर्क साधावा, किंवा ऑनलाईन अर्जासाठी आपले सरकार पोर्टलला भेट द्यावी.
राज्य सरकारच्या या योजनेमुळे अनेक विधवा महिलांना नवा आर्थिक आधार मिळतो आहे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची नवी दिशा मिळते आहे.
🔴 हेही वाचा 👉 आधार कार्डशी ‘या’ तीन गोष्टी लिंक नसतील तर अडकू शकतात तुमची महत्त्वाची काम! जाणून घ्या सविस्तर माहिती.