Tatkal Ticket Rule Change April 2025 IRCTC Clarification : सोशल मीडियावर सध्या “15 एप्रिल 2025 पासून तत्काळ रेल्वे तिकिट बुकिंगच्या वेळा बदलणार” अशी माहिती जोरदार व्हायरल होत आहे. मात्र IRCTC ने अधिकृत स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Railway News: भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास सोय करतात. तत्काळ तिकीट बुकिंग (Tatkal Ticket Booking) ही सुविधा अत्यावश्यक प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल होत होते की, 15 एप्रिलपासून तत्काळ व प्रीमियम तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलल्या जाणार आहेत.
IRCTC च अधिकृत स्पष्टीकरण
ही अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर IRCTC ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून स्पष्टीकरण देत सांगितले की, तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आणि सध्या कोणताही नवीन नियम लागू केला जाणार नाही.
IRCTC ने म्हटलय की, “AC किंवा Non-AC वर्गासाठी तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ तिकिट बुकिंग वेळेत कोणताही बदल प्रस्तावित नाही. तसेच एजंट्ससाठी बुकिंग वेळाही तशाच राहणार आहेत.”
सध्या तत्काळ बुकिंगचे नियम काय आहेत?
- एसी वर्गासाठी (2A, 3A, CC, EC, 3E) तत्काळ बुकिंग प्रवासाच्या आधल्या दिवशी सकाळी 10 वाजता सुरू होते
- नॉन-एसी वर्गासाठी (SL, FC, 2S) बुकिंग प्रवासाच्या आधल्या दिवशी सकाळी 11 वाजता सुरू होते
- फर्स्ट एसीसाठी तत्काळ तिकीट बुकिंग उपलब्ध नाही
🔴 हेही वाचा 👉 महाडीबीटी कृषी अनुदान लाभार्थी यादी मोबाईलवरून ऑनलाईन तपासा.
तत्काळ तिकीट रद्द केल्यावर पैसे परत मिळतात का?
- कन्फर्म तत्काळ तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड मिळत नाही
- जर तत्काळ तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल, तर रद्द करता येते. मात्र यासाठी रेल्वेचे मानक शुल्क वगळण्यात येते
🔴 हेही वाचा 👉 महाडीबीटी कृषी अनुदान लाभार्थी यादी मोबाईलवरून ऑनलाईन तपासा.