Post Office : ५ लाख गुंतवणुकीवर मिळतील १० लाख, सुरक्षित बचतीची खात्री

2 Min Read
Post Office Kisan Vikas Patra Yojana

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘किसान विकास पत्र योजना’ : ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळू शकतात १० लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Kisan Vikas Patra Yojana : बचत करण्यासाठी सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ‘किसान विकास पत्र योजना’ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेचा उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना बाजाराच्या अनिश्चिततेपासून दूर ठेवून निश्चित परतावा देणे. त्यामुळेच ही योजना ग्रामीण व शहरी भागातही दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना ७.५% वार्षिक कंपाऊंड व्याजदर दिला जातो. विशेष म्हणजे, एकावेळी एकरकमी गुंतवणूक केल्यास, ती रक्कम काही वर्षांनंतर दुप्पट होते. उदाहरणार्थ, जर कोणी या योजनेत ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर ११५ महिन्यांनंतर त्यांना १० लाख रुपये मिळू शकतात.

किसान विकास पत्र योजनेचे (Kisan Vikas Patra Yojana) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणुकीची सुरुवात केवळ १००० रुपयांपासून करता येते आणि ती १०० रुपयांच्या पटील करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच इच्छेनुसार कितीही रक्कम गुंतवता येते. ही योजना सिंगल किंवा जॉइंट खाते दोन्ही प्रकारे सुरू करता येते, तसेच १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या नावावरही खाते उघडता येते.

या योजनेतील परताव्याची गणना कंपाऊंड इंटरेस्टच्या आधारावर होते, त्यामुळे गुंतवणूक कालावधी जसजसा वाढतो, तसतसा व्याजातही वाढ होते. यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरु शकते.

बाजारातील अस्थिरतेपासून सुरक्षित राहून, निश्चित परतावा देणारी ‘किसान विकास पत्र योजना’ ही पोस्ट ऑफिसची एक विश्वासार्ह योजना (Government Savings Scheme) आहे. दीर्घकालीन बचतीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना निश्चितच उपयुक्त ठरू शकते, विशेषतः अशा गुंतवणूकदारांसाठी जे जोखमीशिवाय सुरक्षित उत्पन्न शोधत आहेत.

🔴 हेही वाचा 👉 ‘लाडकी बहिण योजना’ संपुष्टात? सरकारने लाखो महिलांना यादीतून वगळल्याचा आरोप.

Share This Article