Free Gas Cylinder: कोणत्या महिलांना मिळतो मोफत गॅस सिलेंडरचा लाभ?

2 Min Read
PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Eligibility News

PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Eligibility : देशातील अनेक महिलांना आजही स्वयंपाकासाठी परंपरागत इंधनाचा वापर करावा लागतो, ज्यामध्ये लाकूड, शेण आणि कोळसा यांचा समावेश होतो. अशा इंधनाचा वापर केल्यामुळे तयार होणाऱ्या धुरामुळे महिलांना श्वासोच्छ्वासासंबंधित आजारांचा सामना करावा लागतो. यासाठीच केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ सुरू केली आहे. या योजनेद्वारे गरजू महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिल जात, जेणेकरून त्या सुरक्षित आणि धुरमुक्त वातावरणात स्वयंपाक करू शकतील.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी (Free Gas Cylinder Maharashtra) काही पात्रता निकष आहेत. सर्वप्रथम, ही योजना केवळ महिलांसाठी आहे. पुरुषांना या योजनेंतर्गत लाभ घेता येत नाही. तसेच, लाभार्थी महिला ही गरीबी रेषेखालील (BPL) असावी, आणि तिचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित घरामध्ये आधीपासून कोणताही एलपीजी गॅस कनेक्शन नसणे अनिवार्य आहे.

पिएम उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यात आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादींचा समावेश होतो. ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

आतापर्यंत देशभरात करोडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही पिएम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता.

🔴 हेही वाचा 👉 कोणाला मिळतो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ? पात्रता आणि फायदे जाणून घ्या.

Share This Article