PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Documents Marathi : भारत सरकार देशातील महिलांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना (Government Scheme for Women) राबवत आहे. त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन (Free Gas Cylinder) दिले जात असून, त्याचा लाभ आज देशभरातील लाखो महिला घेत आहेत.
अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनांचा – जसे की लाकूड, कोळसा, शेणाच्या गोवऱ्या – वापर करून अन्न शिजवतात. या पारंपरिक इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. ही समस्या ओळखून केंद्र सरकारने स्वच्छ इंधन, उत्तम जीवन हे उद्दिष्ट ठेवून पिएम उज्ज्वला योजना सुरू केली आहे.
उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरसह नवीन गॅस कनेक्शन देखील मिळते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे असणे अत्यावश्यक आहे.
उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे:
- BPL कार्ड (Below Poverty Line)
- आधार कार्ड
- वयाचा दाखला (Age Proof)
- मिळकत प्रमाणपत्र किंवा BPL यादीतील नाव
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुकची छायांकित प्रत
- शिधापत्रिका (Ration Card)
महत्त्वाच म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच मिळतो. पुरुषांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या नावावर आपली सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून उज्ज्वला योजनेचा अर्ज करावा, जेणेकरून शुध्द व स्वस्त इंधनाचा लाभ घराघरात पोहोचू शकेल.
🔴 हेही वाचा 👉 केंद्र सरकारकडून ५२ कोटी नागरिकांना ३३ लाख कोटींच कर्ज, ६८% लाभार्थी महिला.