PM Ujjwala Yojana Free Gas Cylinder Application Process : देशातील गरीब महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठीची (Pradhan Mantri Ujjwala Yojana) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतुन पात्र महिलांना मोफत एलपीजी गॅस सिलेंडर दिला जातो. जर आपणही पात्र असाल, तर घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करून मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकता.
उज्ज्वला योजनेसाठी कोण पात्र आहे?
Mofat Gas Yojana Maharashtra Online Registration : पिएम उज्ज्वला योजनेचा लाभ फक्त महिलांनाच दिला जातो, पुरुष या योजनेसाठी पात्र नाहीत. या योजनेच्या पात्रतेसाठी पुढील अटी आहेत:
- अर्जदार महिला ही BPL (गरीबी रेषेखालील) कुटुंबातील असावी.
- महिला 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची असावी.
- तिच्याकडे BPL कार्ड असणे आवश्यक आहे.
- बँक खाते आधारशी लिंक असावे.
पिएम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे अर्ज करता येतो:
अधिकृत वेबसाइटवर जा
- https://pmuy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा.
- “Apply For New Ujjwala 2.0 Connection” या पर्यायावर क्लिक करा.
गॅस कंपनी निवडा
- तुमच्या परिसरात सेवा देणाऱ्या गॅस कंपन्यांच्या यादीतून एक निवडा (उदा. HP, Bharat Gas, Indane).
- संबंधित कंपनीच्या लिंकवर क्लिक करा.
अर्ज फॉर्म भरा
- अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, गॅस वितरकाचे नाव, पिनकोड इत्यादी माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्र अपलोड करा (उदा. आधार कार्ड, BPL कार्ड, बँक पासबुक).
अंतिम सबमिशन करा
- सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर ‘Apply’ बटणावर क्लिक करा.
- माहिती योग्य असल्यास अर्ज स्वीकारला जाईल आणि लवकरच तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर दिला जाईल.
जर तुमच्या घरी अजूनही गॅस कनेक्शन नाही आणि तुम्ही BPL कुटुंबातील महिला असाल, तर उज्ज्वला योजनेद्वारे मोफत एलपीजी कनेक्शन मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ मिळवा.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana Band : लाडकी बहीण योजना बंद होणार? – अजित पवार यांचा मोठा खुलासा.