Farmer ID नसेल तर PM Kisan आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ थांबणार? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती

2 Min Read
PM Kisan Yojana Nnamo Shetkari Yojana Farmer ID Important Update 2025

PM Kisan Yojana Namo Shetkari Yojana Farmer ID Important Update 2025 : PM Kisan आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी आता शेतकऱ्यांना ‘Farmer ID’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढण बंधनकारक झाल आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यात येतो. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून PM किसान सन्मान निधी योजना राबवली जाते, ज्याद्वारे वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते, जी 2023-24 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. या राज्यस्तरीय योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना सहा हप्त्यांमध्ये बारा हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक सहाय्याचा लाभ नियमितपणे मिळत राहावा यासाठी शेतकऱ्यांनी Agristack प्रकल्पांतर्गत आपली नोंदणी करून ‘Farmer ID’ मिळवण आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे ओळखपत्र घेतलेलं नाही, त्यांच्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण भविष्यात लाभासाठी ही ओळख आवश्यक असेल. Farmer ID आणि Farm ID हे आधार क्रमांकासारखे युनिक ओळखपत्र असतील, जे शेतकरी आणि त्यांच्या शेतीच्या जमिनीशी संलग्न राहतील. या ओळखीचा वापर पीक विमा, कर्ज मंजुरी आणि विविध कृषी योजनांच्या अनुदानासाठी डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे.

शेतकरी ओळखपत्रासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, गट क्रमांक, नमुना ८ अ खाते उतारा, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. नोंदणीसाठी तलाठी, कृषी सहाय्यक किंवा जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधण्याच आवाहन करण्यात आल आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ही ओळख तयार केलेली असली तरी काही शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे PM किसान योजनेच्या 19 हप्त्यांद्वारे मिळालेले 38 हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सहा हप्त्यांतील 12 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळवण्यासाठी ही ओळख आवश्यक ठरणार आहे.

Farmer ID हे शेतकऱ्यांसाठी भविष्यातील कृषी धोरणांच्या केंद्रस्थानी असणार एक महत्त्वाच साधन आहे. त्यामुळे अद्याप ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करण गरजेच आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी?.

Share This Article