PF KYC Update Online Process In Marathi : EPFO खात्यातून (PF Account) पैसे काढण्यासाठी KYC अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच KYC पूर्ण नसेल, तर PF मधील रक्कम काढण अवघड होत. त्यामुळे EPFO युजर्ससाठी केवायसी अपडेट करण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे.
जर तुम्हालाही PF मधील पैसे काढायचे असतील आणि तुम्ही अजून KYC पूर्ण केलेली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या EPFO पोर्टलवरून KYC अपडेट करू शकता.
EPFO KYC अपडेट करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
- ब्राऊझरवर ‘Login EPFO’ शोधा आणि EPFO ची अधिकृत वेबसाइट उघडा.
- होमपेजवर ‘KYC Updation (Member)’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून साइन इन करा.
- रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP भरून लॉगिन पूर्ण करा.
- डॅशबोर्डवर ‘Manage’ या टॅबवर क्लिक करा.
- त्याखालील ‘KYC’ पर्याय निवडा.
- आता केवायसी कोणत्या डिटेल्सची करायची आहे (उदा. बँक अकाऊंट, पॅन, पासपोर्ट) हे सिलेक्ट करा.
- बँक अकाऊंटसाठी – नाव, खाते क्रमांक, IFSC कोड इत्यादी माहिती भरून टर्म्स अॅक्सेप्ट करा.
- ‘Save’ वर क्लिक केल्यावर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल.
- OTP टाकून ‘Submit’ करा.
इतक झाल की तुमच PF खात केवायसीसह अपडेट होईल आणि तुम्हाला भविष्यात पैसे काढताना कोणतीही अडचण येणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 पासपोर्टसाठी आता रांगा नाहीत! स्मार्टफोनवरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.