Ladki Bahin Yojana Band : लाडकी बहीण योजना बंद होणार? – अजित पवार यांचा मोठा खुलासा

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Not Closed Maharashtra Ajit Pawar - Ajit Pawar (PTI)

Majhi Ladki Bahin Yojana Not Closed Maharashtra Ajit Pawar : राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावले असून, लाडकी बहीण योजना कायम चालूच राहणार असल्याचा ठाम पुनरुच्चार केला आहे.

अजित पवार यांनी दिला विश्वास – “बजेट मंजूर, योजना सुरूच राहणार”

Ladki Bahin Yojana Band Honar Ka? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, “लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख लोककल्याणकारी योजना आहे आणि ती बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बजेट मंजूर करण्यात आल आहे.”

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीदेखील या योजनेशी संबंधित लाभार्थी महिलांना आश्वस्त करत सांगितले की, “योजनेतील आर्थिक लाभामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.”

कोणत्या महिलांना मिळतो लाडकी बहीण योजनेचा लाभ?

  • ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, अशा पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी थेट आर्थिक मदत दिली जाते.
  • ज्या महिलांना इतर योजनांतून काही प्रमाणात (1500 रुपयांपेक्षा कमी) मदत मिळते, त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून फरकाची रक्कम (उदा. इतर योजनेतून 1000 रुपये मिळत असल्यास, लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये) दिली जातात.

7.74 लाख महिलांना मिळतो फरकाचा लाभ

राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार, ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ या योजनेअंतर्गत दरमहा 1000 रुपये मिळणाऱ्या 7.74 लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून अतिरिक्त 500 रुपये देण्यात येतात.

अजित पवार म्हणाले की, “विरोधक लाडकी बहीण योजनेबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. कदाचित त्यांना योजनेच व्यवस्थापन नीट कळत नसेल किंवा योजनेच्या लोकप्रियतेमुळे त्यांच मनोबल कमी झाल असेल.”

‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरूच राहणार आहे. शासकीय स्तरावरून याबाबत बजेट मंजूर करण्यात आले असून कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये, असे स्पष्ट आवाहन अजित पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी!.

Share This Article