Mahadbt Farmer List 2025 Online Check : महाडीबीटी पोर्टल (Mahadbt Portal) वरून राज्यातील हजारो शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचे (Government Schemes) थकीत अनुदान वितरणास सुरुवात झाली आहे. शासनाच्या कृषी योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नावे आता मोबाईलवर ऑनलाईन यादीत तपासता येणार आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कृषी योजना एकत्रितपणे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. यामध्ये बीज अनुदान, खत अनुदान, यंत्रसामग्री अनुदान, पीक विमा योजनेचा लाभ अशा विविध योजनांचा समावेश आहे. अनेक लाभार्थ्यांचे थकीत अनुदान अडकलेले होते, मात्र शासनाने आता हे वितरण सुरू केले आहे.
कोण पात्र, कोण नाही? ऑनलाईन यादीतून थेट तपासा
अनेक वेळा शेतकरी शंका व्यक्त करतात की, “माझे नाव यादीत का नाही?” किंवा “अनुदान मिळाले का नाही?” अशा वेळी गावातील पात्र लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीने तपासता येते, आणि त्यासाठी फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.
Mahadbt ऑनलाईन यादी कशी तपासाल?
- (https://mahadbt.maharashtra.gov.in) या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.
- डाव्या बाजूस “अर्जाची सद्यस्थिती”, “लॉटरी यादी” व “निधी वितरित लाभार्थी यादी” हे पर्याय दिसतील.
- “निधी वितरित लाभार्थी यादी” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला जिल्हा, तालुका व गाव निवडा.
- गाव निवडल्यानंतर वर्षानुसार यादी दिसेल – यात 2024-25 च्या लाभार्थींची यादीसुद्धा उपलब्ध आहे
- यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव, अनुदान जमा झाल्याची तारीख, आणि कोणत्या योजनेसाठी अनुदान मिळाले याचा तपशील दिला आहे
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त सुविधा
Mahadbt यादी शेतकऱ्यांसाठी पारदर्शकता निर्माण करते. कोण पात्र ठरले? कोणाला किती अनुदान मिळाले? हे सर्व घरबसल्या मोबाईलवरच तपासता येते. यामुळे अपात्रतेबाबत किंवा अनुदान न मिळण्याबाबतची संभ्रम स्थिती दूर होते.
🔴 हेही वाचा 👉 शिधापत्रिकांवर सरकारची नजर; उत्पन्न व रहिवासी पुरावा अनिवार्य, अपात्र ठरल्यास रेशन कार्ड रद्द.