Lakhpati Didi Yojana Maharashtra: महिलांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

2 Min Read
Lakhpati Didi Yojana Maharashtra Apply Loan 2025

Lakhpati Didi Yojana Maharashtra Apply 2025 : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून ‘लखपती दीदी योजना’ महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्यवसाया सुरु करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाची सुविधा दिली जात आहे. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न या योजनेतून स्पष्टपणे दिसून येतो.

लखपती दीदी योजना खासकरून अशा महिलांसाठी आहे ज्या महिला बचत गटांशी संलग्न असून त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे. घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसणे, हा या योजनेतील एक महत्त्वाचा निकष आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचा आराखडा तयार करून तो महिला व बालविकास विभागाकडे सादर करावा लागतो. या आराखड्याची सरकारकडून पडताळणी केल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते. हे कर्ज महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी दिले जाते आणि या कर्जावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही.

लखपती दीदी योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, महिलांना व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणही पुरवले जाते. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी ही योजना उपयुक्त आहे. 

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, शिधापत्रिका व पासपोर्ट साईझ फोटो अशी काही मूलभूत कागदपत्रे सादर करावी लागतात.

मध्य प्रदेशमधून सुरू झालेली ही योजना आता सातपेक्षा अधिक राज्यांमध्ये यशस्वीरित्या राबवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या ‘माझी लाडकी बहिण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) चर्चेत असतानाच ‘लखपती दीदी’ (Lakhpati Didi Yojana 2025) योजनेलाही महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्वतःचा उद्योग सुरू करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिलांसाठी ही योजना एक मोठी संधी घेऊन आली आहे.

🔴 हेही वाचा 👉 अपात्र महिलांवर कारवाई; अर्ज रद्द, एप्रिल पासून हप्ता बंद होण्याची शक्यता.

Share This Article