Ladki Bahin Yojana News Today: लाडकी बहीण योजनेत कोणता बदल? 500 रुपये प्रकरणावर अदिती तटकरे आणि शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

2 Min Read
Ladki Bahin Yojana News Aditi Tatkare Statement

Ladki Bahin Yojana News Today In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सध्या विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असली तरी राज्य सरकारकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. अनेक महिलांना 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळत असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असताना, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि ग्रामविकास मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खुलासा केला आहे.

कोणत्या महिलांना 500 रुपये मिळत आहेत?

अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, नमो शेतकरी सन्मान योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फरकाची रक्कम म्हणजेच 500 रुपये दिले जात आहेत. या महिलांना अन्य शासकीय योजनांमधून दरमहा 1000 रुपये मिळत असल्याने, योजनेच्या नियमांनुसार त्यांना मिळणारी एकूण रक्कम 1500 रुपये होत आहे.

आदिती तटकरे यांचा विरोधकांना पलटवार

Ladki Bahin Yojana Update News Today In Marathi : आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, “28 जून आणि 3 जुलै 2024 रोजी जारी शासन निर्णयानुसार, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत, तर इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना उर्वरित फरक दिला जातो.”  

तटकरे पुढे म्हणाल्या की, 774148 महिलांना दरमहा 500 रुपये फरकाचे अनुदान दिले जात आहे, आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. योजनेच्या अंमलबजावणीत 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल झालेला नाही.

शंभूराज देसाईंची भावनिक प्रतिक्रिया

मंत्री शंभूराज देसाई यांनीही टीकाकारांना उत्तर देताना म्हटले की, “माझ्या लाडक्या बहिणींची किंमत पैशात होऊ शकत नाही. 1500 रुपये ही केवळ आर्थिक मदत नाही, ती त्यांच्या सन्मानाची ओळख आहे. हे सरकार त्यांना भाऊबीज व रक्षाबंधन भेट म्हणून ही मदत देत आहे.”

विरोधकांच्या आरोपांनंतरही सरकारने आपली भूमिका ठामपणे मांडली असून योजनेचे नियम स्पष्ट आहेत. 500 रुपयांचा मुद्दा केवळ काही विशिष्ट योजनांचे लाभार्थी असलेल्या महिलांसाठी लागू आहे. सामान्य पात्र महिलांना 1500 रुपयांचा पूर्ण लाभ यापुढेही मिळत राहणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 8वा वेतन आयोगनंतर केंद्र सरकार आणणार नवी योजना! कुणाला मिळणार लाभ?.

Share This Article