Ladki Bahin Yojana April Installment 3000 Rupees Update : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच बँक खात्यांमध्ये जमा होणार असून यावेळी काही महिलांना नियमित 1500 रुपयांऐवजी थेट 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात. आतापर्यंत 9 महिन्यांचे हप्ते लाभार्थींना वितरित करण्यात आले असून एप्रिल महिन्याचा म्हणजेच दहावा हप्ता (Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment) मिळण्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तात्रिक कारणांमुळे काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला न्हवता, अशा महिलांच्या बँक खात्यात मार्च व एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे म्हणजेच एकूण 3000 रुपये एप्रिल महिन्यात जमा केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत भविष्यात मासिक लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा विचारही सुरू असून त्यासंबंधी मंत्रिमंडळ स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या संदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
तथापि, काही महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण, शासनाकडून योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची नावे हटवण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना एप्रिलचा हप्ता नाकारण्यात येणार आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसून राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ भविष्यातही महिलांना मिळतच राहील.