Ladki Bahin Yojana 500 Rupees: ७.७४ लाख महिलांना ५०० रुपयांचा फरक; सरकारकडून ७७ कोटी रुपयांची बचत

2 Min Read
Ladki Bahin Yojana 500 Rupees Benefit 774k Women Maharashtra

Majhi Ladki Bahin Yojana 500 Rupees : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून महिलांना सन्मान निधी म्हणून दरमहा 1500 रुपये वितरित केले जात आहेत. मात्र या योजनेत सहभागी असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचाही लाभ मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लाभार्थींना लाडकी बहीण योजनेच्या अटींनुसार ५०० रुपयांचा फरक अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य योजनांचा एकत्रित लाभ

७ लाख ७४ हजार १४८ महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी ६,००० रुपये आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून राज्य सरकारकडून देखील ६,००० रुपये मिळतात. त्यामुळे त्यांना वर्षाला एकूण १२,००० रुपयांचा लाभ मिळतो. हा लाभ दरमहा 1,000 रुपये इतका ठरतो. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेतून उर्वरित ५०० रुपये फरकाचा निधी त्यांना मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) अर्ज केलेल्या २ कोटी ४६ लाख महिलांपैकी ५ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या असून, यामुळे शासनाचे ७५ कोटी रुपये वाचले आहेत. याशिवाय, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पूर्ण 1500 रुपये न देता 500 रुपये देण्यात येणार असल्याने आणखी ७७ कोटी ४१ लाख रुपये शासकीय बचतीत जमा होणार आहेत.

पडताळणी पुन्हा सुरू

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यापूर्वीच स्पष्ट केल होत की, केसरी आणि पिवळ्या शिधापत्रिका वगळता उर्वरित महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येईल. काही काळ थांबलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

शासन निर्णयात कोणताही बदल नाही

२८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, ज्या महिलांना अन्य योजनांमधून दरमहा 1500 पेक्षा कमी लाभ मिळतो, त्यांना उर्वरित फरक (जसे की 500 रुपये) सन्मान निधी म्हणून देण्यात येतो. या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana April पैसे कधी जमा होणार? Installment Date Maharashtra.

Share This Article