Ladki Bahin Yojana 2100 Rupees Payment Update Hasan Mushrif Statement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदत करणारी महत्वाची योजना ठरली आहे. निवडणुकीच्या काळात चर्चेचा विषय ठरलेली लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनली असून, आतापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. परंतु, महायुतीने निवडणुकीपूर्वी केलेल्या दरमहा 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, हे लक्षात घेता अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
निवडणुकीपूर्वीचे आश्वासन अद्याप अपूर्ण
महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर केले होते की, सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवला जाईल. नोव्हेंबरमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाने शपथ घेतली, आणि मार्चमध्ये अर्थसंकल्पही सादर करण्यात आला. मात्र तरीही, या वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण आणि वाद
या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठ वक्तव्य करत सांगितल की, “लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी दिले जातील. कारण हे पैसे न दिल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मत मिळणार नाहीत, हे आम्हाला माहिती आहे.” तसेच, नमो सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे कमी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
मुश्रीफांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र टीका केली. “हे वक्तव्य अतिशय असंवेदनशील असून लोकप्रतिनिधींनी सेवा भावनेतून काम करावे लागते. मतांसाठी अशा प्रकारचे विधान धक्कादायक आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महिलांमध्ये संभ्रम कायम
सरकारकडून वेळोवेळी “योग्य वेळी निर्णय घेऊ,” असे सांगण्यात येत असले तरी, 2100 रुपयांचा हप्ता नेमका कधीपासून सुरू होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये प्रतीक्षेच आणि संभ्रमाच वातावरण कायम आहे.
🔴 हेही वाचा 👉 आधार अपडेटनंतर आधार नंबर बदलतो? UIDAI काय सांगतय जाणून घ्या.