Indian Railways ATM In Train Marathi News : भारतीय रेल्वे आता प्रवाशांच्या सोयीसाठी एक अत्यंत उपयुक्त सुविधा घेऊन येत आहे. जर तुम्ही घरून निघताना कॅश (रोख रक्कम) घ्यायला विसरलात, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण लवकरच चालत्या गाड्यांमध्येच एटीएममधून पैसे काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
भारतीय रेल्वेचा जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये समावेश होतो. देशातील कोट्यवधी प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान काही वेळा रोख रकमेची गरज भासते. मग ती खाण्या-पिण्यासाठी असो वा एखाद्या इमर्जन्सी परिस्थितीसाठी. अशा वेळी प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने अभिनव पाऊल उचलले आहे.
‘चालत्या रेल्वेत ATM’ – पंचवटी एक्सप्रेसमधून सुरुवात
Indian Railways Started ATM Service In Train : भारतीय रेल्वेने सुरुवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला असून, नाशिक ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा प्रथम सुरू करण्यात आली आहे. या गाडीच्या एसी डब्यात ATM मशीन बसवण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने ही सेवा पुरवली आहे.
जर या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला, तर रेल्वे प्रशासन ही सेवा देशभरातील इतर प्रमुख ट्रेनमध्येही सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भविष्यात दीर्घ प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांना रोख पैशाची चिंता भासणार नाही.
ही सेवा केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. कारण अनेकदा प्रवासात अचानक उद्भवणाऱ्या गरजांसाठी ATMची सुविधा लाभदायक ठरु शकते.
भारतीय रेल्वेच्या या नव्या प्रयोगामुळे रेल्वे प्रवास अधिक आधुनिक आणि सुविधायुक्त होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले आहे. लवकरच देशभरातील प्रमुख रेल्वे गाड्यांमध्येही ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 अशी करा आधार कार्डच्या गैरवापराची तपासणी.