Aadhaar Card Photo Update Online Process India News: आजच्या घडीला भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच ओळखपत्र बनल आहे. यामध्ये केवळ नाव, पत्ता, आणि जन्मतारीखच नाही तर बायोमेट्रिक माहिती आणि फोटोदेखील असतो. परंतु अनेक नागरिक आपला आधार कार्डवरील जुना किंवा अस्पष्ट फोटो पाहून कंटाळले आहेत. अशा नागरिकांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे हा फोटो सहजपणे बदलता येतो. आणि ही प्रक्रिया संपूर्णपणे अधिकृत असून, काही सोप्या टप्प्यांद्वारे पार पाडता येते.
आधार कार्डसंबंधित सेवा पुरवणारी संस्था UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ही 12 अंकी Aadhaar नंबर जारी करते. आज भारतातील जवळपास 95% नागरिकांकडे आधार कार्ड आहे. अनेक सरकारी सेवा आणि लाभासाठी हे एक बंधनकारक दस्तऐवज बनल आहे. त्यामुळे यामध्ये दिलेली माहिती अद्ययावत ठेवण अत्यंत महत्त्वाच आहे.
आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. त्यासाठी आपल्याला आधार एनरोलमेंट सेंटर किंवा आधार सेवा केंद्रात प्रत्यक्ष जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून (uidai.gov.in) फोटो अपडेटसाठी लागणारा ‘Form 1’ डाऊनलोड करता येतो. हा फॉर्म प्रिंट करून, बिनचूक माहिती भरून जवळच्या आधार सेंटरमध्ये सादर करावा लागतो. इच्छुक असल्यास सेंटरवर जाऊनही थेट फॉर्म मिळवून भरता येतो.
फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन घेतला जातो. नंतर तुमचा नवीन फोटो तिथेच लाईव्ह क्लिक केला जातो. आणि तो फोटो जुन्या फोटोच्या जागी अपडेट केला जाते. यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. आधार कार्डमधील फोटो लगेच अपडेट होत नाही, त्यासाठी एक ते तीन दिवस लागतात. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाते ज्यामध्ये URN (Update Request Number) दिला असतो. या नंबरच्या आधारे तुम्ही UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन स्टेटस ट्रॅक करू शकता.
फोटो अपडेट झाल्यानंतर UIDAI च्या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या नवीन फोटोसह बनलेले आधार कार्ड डाउनलोड करू शकता. फोटो अपडेट करण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे अधिकृत असून, नागरिकांनी कोणत्याही एजंट किंवा तिसऱ्या व्यक्तीवर अवलंबून न राहता थेट अधिकृत माध्यमांतूनच सेवा घ्याव्यात, असा सल्ला UIDAI ने दिला आहे.
🔴 हेही वाचा 👉 कोणत्या महिलांना मिळतो मोफत गॅस सिलेंडरचा लाभ?.