Aadhaar Card Misuse Check: अशी करा आधार कार्डच्या गैरवापराची तपासणी

2 Min Read
Aadhaar Card Misuse Check Online Marathi

Aadhaar Card Misuse Check Online Marathi : आधार कार्ड हे सध्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. शाळा, बँक, सरकारी योजना किंवा इतर कोणतीही सेवा घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. त्यामुळेच त्याचा गैरवापर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेकदा फसवणूक करणारे लोक सामान्य नागरिकांच्या आधार क्रमांकांचा गैरवापर करतात. परंतु दिलासा म्हणजे, तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डाचा चुकीचा वापर झाला आहे का, हे ऑनलाईन तपासू शकता.

सध्या देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आपले वैयक्तिक आधार कार्ड (Aadhaar Card) आहे. वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे आधारचा उपयोग वाढलेला असतानाच त्याच्या सुरक्षेचा मुद्दाही गंभीर बनला आहे. जर तुम्हाला शंका वाटत असेल की, तुमच्या आधारचा कोणी गैरवापर करत आहे, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट आणि मोबाईल किंवा संगणकाची गरज आहे.

UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या अधिकृत वेबसाईट किंवा ‘My Aadhaar’ अ‍ॅपवर लॉगिन करून, ‘Authentication History’ विभागातून तुम्ही तुमच्या आधारशी संबंधित सर्व व्यवहार पाहू शकता. यात कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि कोणत्या प्रकारचा वापर झाला आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळते. जर तुम्हाला या यादीत एखादा अपरिचित व्यवहार दिसत असेल, तर त्याची तात्काळ तक्रार नोंदवा.

तक्रार करण्यासाठी UIDAI ने हेल्पलाइन क्रमांक 1947 उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय, तुम्ही help@uidai.gov.in या अधिकृत ई-मेलवरही आपली तक्रार पाठवू शकता.

याशिवाय, आधारचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही बायोमेट्रिक लॉक सुविधेचा वापर करू शकता. ही सुविधा वापरून तुमचे फिंगरप्रिंट आणि आयरिस डेटाचा गैरवापर होण्यापासून प्रतिबंध करता येतो. UIDAI च्या वेबसाईटवर लॉगिन करून ‘Lock/Unlock Biometrics’ या पर्यायातून वर्च्युअल आयडी, नाव आणि पिनकोड भरून बायोमेट्रिक लॉक केला जाऊ शकतो.

या संपूर्ण प्रणालीचा उपयोग करून, तुमचे आधार कार्ड अधिक सुरक्षित ठेवता येतो. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आपला आधार वापर तपासावा आणि कोणताही संशयास्पद व्यवहार (Aadhaar Card Misuse) दिसल्यास त्वरित कारवाई करावी.

🔴 हेही वाचा 👉 घरबसल्या मिळवा नवीन LPG गॅस कनेक्शन, जाणून घ्या ऑनलाइन अर्जाची सोपी प्रक्रिया.

Share This Article