Majhi Ladki Bahin Yojana News: अपात्र महिलांवर कारवाई; अर्ज रद्द, एप्रिल पासून हप्ता बंद होण्याची शक्यता

2 Min Read
Ladki Bahin Yojana Ineligible Women Action April Payment Update 2025

Ladki Bahin Yojana Ineligible Women Action April Payment Update 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांवर सरकारने मोठी कारवाई करण्याची तयारी केली आहे. अशा महिलांचे अर्ज रद्द करून त्यांना यापुढे योजनेचा कोणताही लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेतील पात्रता निकषांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी अर्जांची पाच टप्प्यांत तपासणी सुरू केली आहे. यामध्ये चारचाकी वाहनांची मालकी, शासकीय नोकरीतील सदस्य, आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी काही निकषांवर आधीच तपासणी पूर्ण झाली असली, तरी महिला लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आयकर विभागाकडून संबंधित माहिती मिळाल्यानंतर अंतिम टप्प्यातील तपासणी पूर्ण होणार आहे.

राज्यातील अनेक महिलांनी स्वखुशीने अर्ज मागे घेतले असून, अनेक अपात्र अर्ज लवकरच रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार, अपात्र लाभार्थ्यांचे खाते रोखण्यात येईल आणि त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.

दरम्यान, मार्चपर्यंतचे सर्व हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेला म्हणजेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे ३६,००० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवत असून, लाभार्थ्यांची अंतिम यादी केवळ पात्र महिलांपुरती मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

🔴 हेही वाचा 👉 ८ लाख लाडक्या बहिणींच्या मासिक मानधनात कपात; १५०० रुपयांऐवजी केवळ….

Share This Article