Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता ३० एप्रिलला? पण नवीन नोंदणीच काय?

2 Min Read
Ladki Bahin Yojana April 2025 Payment Update Maharashtra

Ladki Bahin Yojana April 2025 Payment Update Maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ ठरणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, काही महिलांना डबल पैसे का मिळणार? आणि नवीन अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होईल याबाबत सध्या महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

राज्य शासनाच्या या योजनेतून सध्या दरमहा १५०० रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले जात आहेत. एप्रिल २०२५ महिन्याचा हप्ता ३० तारखेला जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी नुकतीच दिली आहे.

काही महिलांना मिळणार ३ हजार रुपये?

मार्च महिन्यात तांत्रिक कारणांमुळे अनेक महिलांचे पेमेंट अडलकले होते. बँक खात्यातील चुकीची माहिती, आधार लिंकिंगमध्ये गोंधळ, किंवा DBT निष्क्रिय असल्याने काही महिलांना मार्चचा हप्ता मिळालाच नव्हता. आता एप्रिलमध्ये त्यांना मागील महिन्याचा आणि सध्याचा हप्ता मिळून एकूण ३,००० रुपये मिळू शकतात.

लाभार्थ्यांची संख्या का घटली?

माझी लाडकी बहीण योजनेतून (Mazi Ladki Bahin Yojana) सध्या अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडणाऱ्या, चारचाकी असलेल्या कुटुंबातील, सरकारी नोकरी वा पेन्शनधारक महिला, तसेच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जात आहे. मार्चमध्ये सुमारे १३ लाख महिलांना योजनेतून बाहेर काढले गेले आहे.

नवीन अर्ज प्रक्रियेच काय?

सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची नवीन नोंदणी बंद आहे. ऑक्टोबर २०२४ पासून नवीन अर्ज स्वीकारले गेले नाहीत. सरकारकडून विद्यमान लाभार्थ्यांची छाननी सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतरच नवीन अर्जांना परवानगी मिळेल. सध्या कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

लाभ थांबू नये यासाठी महिलांनी काय कराव?

  • बँक खात आणि आधार लिंक अपडेट आहे का, ते तपासा  
  • DBT स्टेटस सक्रिय आहे याची खात्री करा  
  • कोणतही कागदपत्र त्रुटीग्रस्त असेल तर स्थानिक सेवा केंद्राशी संपर्क साधा  
  • ladkibahin.maharashtra.gov.in वेबसाईट किंवा ‘नारी शक्ती दूत’ अ‍ॅपवर आपली स्थिती तपासा 
  • तक्रार निवारण – 181 हेल्पलाइनवर संपर्क साधा

🔴 हेही वाचा 👉 एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 3000 रुपये? जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ.

Share This Article