Aadhar Card Mobile Number Update: आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

2 Min Read
Aadhar Card Mobile Number Update Process Fees

Aadhar Card Mobile Number Update Process : आधार कार्डावरील मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध नाही. त्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात प्रत्यक्ष जावे लागते. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून यासाठी ₹50 शुल्क लागते आणि यासाठी 5 ते 7 दिवसांचा वेळ लागू शकतो.

तुमच्या आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाइल नंबर जर बंद झाला असेल, किंवा OTP येत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत तुम्ही आधार कार्डवर नवीन मोबाइल नंबर अपडेट करू शकता. परंतु, ही प्रक्रिया घरी बसून ऑनलाईन करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे लागते.

यासाठी आधार सेवा केंद्रावर जाऊन एक फॉर्म भरावा लागतो, ज्यामध्ये नवीन मोबाइल नंबर भरून द्यावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर आधार केंद्रातील कर्मचारी बायोमेट्रिक वेरिफिकेशन (फिंगरप्रिंट स्कॅनिंग) करतात आणि त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. 

या प्रक्रियेनंतर तुम्हाला एक पावती दिली जाते, ज्यामध्ये URN (Update Request Number) असतो. या URN नंबरद्वारे UIDAI च्या वेबसाइटवरून तुमच्या मोबाईल नंबर अपडेटची स्थिती ट्रॅक करता येते.

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकरले जात असून, जर तुम्ही त्याच वेळी पत्ता किंवा ईमेल आयडी देखील अपडेट केला, तरी एकूण शुल्क ₹50 इतकेच द्यावे लागते.

आधार मध्ये मोबाइल नंबर अपडेट होण्यासाठी सहसा 2 ते 7 दिवस लागतात. तुम्ही mAadhaar अ‍ॅप किंवा UIDAI वेबसाइटवर जाऊन चेक करू शकता. आधारशी योग्य नंबर लिंक केल्यास डिजिलॉकर, पॅन-आधार लिंकिंग, मोबाईल सिम व्हेरिफिकेशन यांसारख्या सर्व सेवांचा OTP द्वारे सहज लाभ घेता येतो. त्यामुळे मोबाइल नंबर बदलल्यानंतर तो आधारमध्ये तात्काळ अपडेट करणे गरजेचे आहे.

Share This Article