Does Aadhar Number Change After Update UIDAI Guidelines 2025 : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजना असो वा बँक व्यवहार, अनेक ठिकाणी आधार कार्डची अनिवार्यता आहे. त्यामुळे आधार कार्डातील माहिती अचूक असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाइल नंबर यामध्ये चूक झाल्यास UIDAI कडून आधार अपडेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेकांना एक सामान्य प्रश्न पडतो की, आधार अपडेट केल्यावर आधार नंबर बदलतो का? या शंकेबाबत स्पष्ट माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
काय असते आधार अपडेट?
आधार अपडेट म्हणजे आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी तसेच बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट, डोळ्यांची बुबुळे) इत्यादी गोष्टींमध्ये बदल करणे. UIDAI ने वेळोवेळी आधार धारकांना त्यांची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शासकीय सेवांचा लाभ घेताना अडचण येऊ नये.
आधार नंबर बदलतो का?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार नंबर कधीच बदलत नाही. एकदा १२ अंकी आधार क्रमांक देण्यात आला असतो तो आयुष्यभरासाठी कायम राहतो. तुम्ही कितीही वेळा नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा बायोमेट्रिक माहिती अपडेट केली तरी तुमचा आधार नंबर सर्वस्वी कायम असतो तो कधीच बदलत नाही.
UIDAI च्या अधिकृत माहितीनुसार, आधार क्रमांक एकदाच जारी केला जातो आणि तो बदलता येत नाही. आधार अपडेट केल्यानंतर केवळ नवीन कार्ड किंवा e-Aadhaar ची अद्ययावत प्रत मिळते, परंतु त्यावरील १२ अंकी आधार क्रमांक तोच असतो.
जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर आधार क्रमांक बदलण्याची चिंता करण्याची गरज नाही. तुमचा आधार क्रमांक कायमचा ओळख क्रमांक असतो तो कधीच बदलत नाही केवळ इतर तपशील अद्ययावत होतात.
🔴 हेही वाचा 👉 आधार केंद्र चालकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ, नवीन आधार कीट वाटप सुरू.