Aadhar Center: आधार केंद्र चालकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ, नवीन आधार कीट वाटप सुरू

2 Min Read
Aadhar Center Operators Kit Update Honorarium Increase Maharashtra 2025

Aadhar Center Operators Kit Update Honorarium Increase Maharashtra 2025 : राज्यातील आधार केंद्र चालकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मागणीनंतर आता सरकारने नवीन अद्ययावत आधार संच (Aadhaar Kits) उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आधार नोंदणीदरम्यान मिळणाऱ्या मानधनातही लक्षणीय वाढ जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई शहर व उपनगरातील आधार केंद्र चालकांना नुकतेच हे कीट वितरीत करण्यात आले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या आधार संचांचे सुपूर्तीसत्र पार पडले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मानधन २० रुपयांवरून थेट ५० रुपयांपर्यंत

याआधी आधार केंद्र चालकांना प्रत्येक आधार नोंदणीसाठी केवळ २० रुपये मानधन मिळत होते. मात्र आता त्यात वाढ करून ५० रुपये प्रति नोंदणी करण्यात आले आहे. म्हणजेच, प्रत्येक आधार नोंदणीमागे केंद्र चालकाला आता ३० रुपये अधिक मिळणार आहेत.

ही वाढ केवळ आर्थिक सवलत नाही, तर डिजिटल सेवांची गुणवत्ता आणि केंद्र चालकांची प्रेरणा वाढवण्याच्या दिशेने उचललेल महत्त्वाच पाऊल मानल जात आहे.

१२.८ कोटी आधार नोंदणी पूर्ण

राज्यातील एकूण १२ कोटी ८० लाख आधार नोंदण्या पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे ० ते ५ वयोगटातील ३९ टक्के आधार नोंदणी यामध्ये पूर्ण झाली आहे. केंद्र चालकांकडून उर्वरित अपूर्ण नोंदण्या पूर्ण करण्यासाठी नवे संच व वाढीव मानधन उपयुक्त ठरणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता कधी मिळणार? काहींना ₹१५०० तर काहींना फक्त ₹५००; जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

Share This Article