Ladki Bahin Yojana April 2025 Payment : राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. एप्रिल महिन्याचा सन्मान निधी कधी खात्यात जमा होणार, याकडे राज्यभरातील पात्र महिलांचे लक्ष लागून राहिले असताना, काहींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार असल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात आला आहे.
अजूनही नियमात कोणताही बदल नाही
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केल आहे की, ३ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे नियम पूर्ववतच लागू आहेत. त्यानुसार, ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी मिळतो. मात्र, ज्या महिलांना इतर योजना, जसे की ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ (१००० रुपये प्रति महिना) लाभ मिळतो, त्यांना उर्वरित फरकाची रक्कम म्हणजे ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतील.
राज्यातील ७७४१४८ महिलांचा समावेश असून त्यांना लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये सन्मान निधी मिळणार आहेत, अस अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेला?
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, अक्षय तृतीयेला म्हणजेच ३० एप्रिल २०२५ रोजी १५०० रुपयांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच निधी वितरण होणार आहे.
अजित पवार यांचा खुलासा
लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये दिले जातात की १५०० रुपये दिले जात आहेत यावरील गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्राच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ वेगळा असून, राज्याच्या लाडकी बहीण योजनेतून मिळणारा सन्मान निधी हा स्वतंत्र आहे. महिलांना या दोनपैकी कोणता लाभ घ्यायचा हे पूर्णतः ऐच्छिक आहे,” अस ते म्हणाले. तसेच, “पात्र महिलांनी ५०० रुपये मिळणाऱ्या योजनेऐवजी थेट १५०० रुपयांचा लाभ घेण्याचा पर्याय निवडावा,” असा सल्ला त्यांनी दिला.
फेब्रुवारी व मार्च हप्ते मिळाले
दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च २०२५ महिन्यांचे हप्ते ७ मार्च ते १२ मार्च या कालावधीत पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. या दोन महिन्यांचा मिळून एकूण ३००० रुपयांचा सन्मान निधी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आला आहे.
🔴 हेही वाचा 👉 देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ का मिळत नाही?.