Ration Card News Maharashtra: महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! 30 एप्रिलनंतर मोफत रेशन बंद?

2 Min Read
Ration Card E KYC Deadline Maharashtra 2025

Ration Card E KYC Deadline Maharashtra 2025 : रेशनवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, 30 एप्रिल 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यास, लाभार्थ्यांना पुढे शिधा (रेशन) मिळण्यात अडचण निर्माण होणार आहेत.

राज्य शासनाने देखील ई-केवायसीला गती देण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासनांना सूचना दिल्या असून, शासकीय रेशन दुकानांतील वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

का आवश्यक आहे ई-केवायसी?

सरकार दरमहा गरीब व गरजू कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तू अत्यंत कमी दरात वितरित करते. मात्र, अचूक लाभार्थी निवडण्यासाठी आणि बनावट कार्डधारकांना वगळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचे रेशन कार्ड आधार पडताळणी करणे आवश्यक आहे.

ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांची खरी ओळख निश्चित होते, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यसंख्या, त्यांचे आधार तपशील, आणि इतर महत्त्वाची माहिती यांचा समावेश असतो.

कोणती माहिती लागणार?

  • आधार कार्ड (सर्व कुटुंब सदस्यांचे)
  • रेशन कार्ड
  • सदस्य वगळायचा असल्यास मृत्यु प्रमाणपत्र
  • नवीन सदस्य जोडायचा असल्यास जन्म प्रमाणपत्र

ई-केवायसी करण्याचे मार्ग:

मोबाइल अ‍ॅपद्वारे (घरबसल्या):

  • ‘Mera e-KYC’ अ‍ॅप डाउनलोड करून, आधार क्रमांक व मोबाईल OTP द्वारे e-KYC करता येते.
  • अ‍ॅपमध्ये लॉगिन करून सर्व तपशील भरा आणि सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पूर्ण झाल्याचा संदेश मिळतो.

जवळच्या रेशन दुकानात (ऑफलाइन):

  • ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नाही, त्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन फिंगरप्रिंट पडताळणी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी.

30 एप्रिल ही अंतिम मुदत

राज्य सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 30 एप्रिल 2025 पर्यंत ज्या कुटुंबांचे e-KYC पूर्ण झालेले नसेल, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी इतर सर्व कामांपेक्षा हे काम तातडीने पूर्ण करावे.

🔴 हेही वाचा 👉 प्रधानमंत्री आवास योजनेत मोठा बदल, आता ग्रामीण महाराष्ट्रातील वंचित कुटुंबांना मिळणार थेट लाभ.

Share This Article