PM Awas Yojana Maharashtra Rural Housing Survey 2025 : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील अनेक पात्र ग्रामीण कुटुंबांना लवकरच थेट लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान विशेष सर्वेक्षण पंधरवडा राबवला जात आहे. यामध्ये घरकुल योजनेपासून (Gharkul Yojana 2025) वंचित लाभार्थ्यांची ओळख पटवून, त्यांना योजनेंतर्गत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन संयुक्तपणे ही मोहीम राबवत असून, यामध्ये ग्रामपंचायतस्तरावर लाभार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या PM Awas Yojana, Digital Seva Kendra, Ayushman Bharat Card, जात व उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या नागरिक केंद्रित सेवांचा समावेश आहे.
प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी तयार करून ती संबंधित पोर्टलवर अपलोड केली जावी. ग्रामसेवक, तलाठी, BLO आणि पंचायत समिती स्तरावर विशेष सर्वेक्षण टीम नेमण्यात आल्या असून त्या तातडीने आणि गुणवत्तेने काम करणार आहेत.
सरकारचा स्पष्ट हेतू आहे की, कोणताही पात्र नागरिक घरकुल योजनेपासून वंचित राहू नये. विशेषतः स्वतःची जमीन असूनही ज्यांना अद्याप पक्क घर मिळालेल नाही, अशा कुटुंबांना प्राधान्याने समाविष्ट करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणताही रोजगाराचा पुरावा आवश्यक नसून, स्वयंरोजगार करणारे, छोट दुकान चालवणारे, किंवा शेती करणारे नागरिक देखील पात्र असतील.
या योजनेअंतर्गत भविष्यात लाभार्थ्यांना डिजिटल सेवा केंद्रांमार्फत आपले प्रमाणपत्र, आधार क्रमांक, हेल्थ कार्ड, आणि अन्य आवश्यक सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभरातील निवडक गावांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय, शासनाने वॉटर हार्वेस्टिंग, अवैध वाळू उपसा प्रतिबंध, धान उचल प्रक्रिया, आणि लोकसेवा हमी अंतर्गत तक्रारींचे निवारण यावरही भर दिला आहे. सर्व जिल्ह्यांना आदेश देण्यात आले आहेत की प्रत्येक अर्जाचा वेळीच तपासणी करून संबंधित नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात यावा, आणि यासाठी योग्य ती कार्यवाही केली जावी.
🔴 हेही वाचा 👉 ‘पेंशन फॉर ऑल’ योजना, दुकानदार, छोटे व्यापारी, कामगारांसाठी नवीन पेन्शन योजना.