Pension For All Scheme: ‘पेंशन फॉर ऑल’ योजना, दुकानदार, छोटे व्यापारी, कामगारांसाठी नवीन पेन्शन योजना

2 Min Read
Pension For All Scheme For Shopkeepers Workers Expected To Launch By End Of 2025

Pension For All Scheme : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक योजना लवकरच राबवली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ‘पेंशन फॉर ऑल स्कीम’ (Pension For All Scheme 2025) या नावाने सर्वसामान्य नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याच्या संकल्पनेला अंतिम टप्प्यात नेले असून ही योजना २०२५ सालच्या अखेरीस प्रत्यक्षात आणण्याचे संकेत आहेत. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी धोरणात्मक पातळीवर हालचाली सुरू असून, येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

‘पेंशन फॉर ऑल स्कीम’ या नव्या पेन्शन योजनेची खास बाब म्हणजे, योगदान करणाऱ्या व्यक्तीस केवळ किमान रक्कमच नव्हे तर अतिरिक्त बचतही आपल्या पेन्शन खात्यात जमा करण्याची मुभा असणार आहे. म्हणजेच, जर एखादा नागरिक दरमहा 3,000 रुपये नियमित योगदान करत असेल आणि त्याच्याकडे एका वेळी 30,000 किंवा 50,000 रुपये अतिरिक्त रक्कम उपलब्ध असेल, तर तो ती रक्कमदेखील पेन्शन फंडात भरू शकतो. यामुळे पेन्शन कालावधी सुरू करण्याचा पर्यायही स्वतःच्या गरजेनुसार निवडता येणार आहे.

या पेंशन योजनेत कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. कोणत्याही व्यक्तीस रोजगाराच्या अटिविना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच, जर कोणी स्वतःचे किराणा दुकान चालवत असेल, गॅरेज, भाजीविक्री किंवा इतर कोणत्याही प्रकारचा छोटा व्यवसाय करत असेल आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता म्हणून पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यालाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे ठेवण्यात आली असून, त्यानंतर कोणत्याही वयाचा नागरिक स्वतःच्या पसंतीनुसार योगदान देऊ शकतो.

🔴 हेही वाचा 👉 लोन न भरल्यान रिकव्हरी एजंट त्रास देतोय? हा कायदेशीर नियम तुम्हाला माहित असायलाच हवा.

Share This Article