Loan Recovery Agent Rights Rules In Marathi : आजच्या डिजिटल युगात मोबाईल अॅप्सच्या मदतीने घरबसल्या काही मिनिटांत लोन मिळवण अगदी सोप झाल आहे. मात्र, अनेकदा लोन घेतल्यानंतर एखाद्या अडचणीमुळे हप्ते वेळेवर भरण शक्य होत नाही. अशा वेळी बँक किंवा वित्तसंस्था त्यांच्या कर्जाची वसूली करण्यासाठी रिकव्हरी एजंटची मदत घेतात. हे एजंट कर्जदाराच्या घरी जाऊन पैसे भरण्यासाठी दबाव टाकतात. काही वेळा ते धमकी देतात, अपमानास्पद वागणूक देतात आणि मानसिक त्रासही देतात. मात्र, असे वर्तन पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याविरोधात कर्जदारांना आपले हक्क माहिती असणे आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात स्पष्ट नियम घालून दिले आहेत. त्यानुसार कोणताही रिकव्हरी एजंट सकाळी आठ वाजण्यापूर्वी किंवा रात्री सात वाजल्यानंतर कर्जदाराशी संपर्क करू शकत नाही. तसेच, एजंटकडून धमकी देण, जबरदस्ती करण किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक छळ करण कायद्यानुसार गुन्हा मानला जातो. जर एखादा एजंट या नियमांच उल्लंघन करत असेल, तर त्याविरोधात संबंधित बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. तक्रार करताना त्या घटनेचा तपशील, एजंटचे नाव, तारीख आणि प्रसंग याबाबत स्पष्ट माहिती द्यावी.
Loan Recovery Agent Rules In Marathi : जर एजंटचा त्रास अधिकच वाढत असेल आणि तो शारीरिक धमकी देत असेल, तर जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करावी. अशा प्रसंगी पुरावा म्हणून कॉल्स, मेसेजेस किंवा त्याचे रेकॉर्डिंग साठवून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. त्याचबरोबर, जर एखादी व्यक्ती खरंच लोन भरण्यात असमर्थ असेल, तर संबंधित बँकेशी संवाद साधून लोन रिस्ट्रक्चरिंग किंवा हप्त्यांमध्ये सवलत याबाबत चर्चा करता येते. बऱ्याच बँका अशा ग्राहकांना पुन्हा नव्याने परतफेडीची संधी देतात.
एकूणच, रिकव्हरी एजंटच्या त्रासाला बळी पडू नका. आरबीआयने ठरवलेले नियम आणि कायदे तुमच्या बाजूने आहेत. योग्य पद्धतीने तक्रार करून आणि पुरावे सादर करून तुम्ही स्वतःच कायदेशीर संरक्षण करू शकता. आर्थिक अडचणी आल्या असल्या तरीही तुमच मनोधैर्य खचू देऊ नका आणि कायद्याने दिलेले अधिकार वापरून मानसिक त्रासापासून स्वतःच संरक्षण करा.
🔴 हेही वाचा 👉 PF KYC अपडेट कस कराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया.