Passport Registration Online India: पासपोर्टसाठी आता रांगा नाहीत! स्मार्टफोनवरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

2 Min Read
Online Passport Application India Marathi

Passport Registration Online India : आता परदेश प्रवासासाठी पासपोर्ट बनवण्यासाठी रांगेत उभ राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने सहजपणे पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. सरकारने ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल करून नागरिकांसाठी अधिक सुलभ केली आहे.

पासपोर्ट हे केवळ परदेश प्रवासासाठीची कागदपत्र नाही, तर ते आपल्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. दरवर्षी लाखो भारतीय नवीन पासपोर्टसाठी अर्ज करतात. आता ही संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या पार पाडता येते.

पासपोर्ट मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक

  1. अर्जासाठी वेबसाईटवर भेट द्या:
    सर्वप्रथम https://passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. नवीन युजर रजिस्ट्रेशन:
    ‘New User Registration’ वर क्लिक करून तुमची माहिती भरून खाते तयार करा.
  3. पोर्टलवर लॉगिन करा:
    युजर आयडी व पासवर्डने लॉगिन करा.
  4. अर्ज भरा:
    ‘Apply for Fresh Passport/Re-issue’ या पर्यायावर क्लिक करा आणि अर्जामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक माहिती व अन्य तपशील भरा.
  5. अ‍ॅपॉइंटमेंट बुक करा:
    फॉर्म सबमिट केल्यानंतर ‘Pay and Schedule Appointment’ वर क्लिक करा. जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी अपॉइंटमेंट बुक करा आणि आवश्यक शुल्क ऑनलाइन भरा.
  6. फी भरल्यानंतर रिसीट डाउनलोड करा:
    यात तुमचा Application Reference Number आणि अपॉइंटमेंटची तारीख असते.
  7. अपॉइंटमेंट दिवशी काय न्याव लागत?
    दिलेल्या दिवशी आवश्यक मूळ कागदपत्र आणि त्याच्या छायांकित प्रती घेऊन सेवा केंद्रात जा. तिथे बायोमेट्रिक प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणी होईल.
  8. पोलीस वेरिफिकेशननंतर पासपोर्ट मिळेल:
    पोलीस पडताळणी पूर्ण झाल्यावर पासपोर्ट स्पीड पोस्टद्वारे तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

आता ही प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि वेळ वाचवणारी बनली आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक सुविधा! आता चालत्या गाडीमध्येच मिळणार ATM सेवा.

Share This Article