PM Awas Yojana 2025: पक्क्या घरासाठी सरकार देत आहे आर्थिक मदत, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या

2 Min Read
PM Awas Yojana 2025 Apply Benefits Marathi

PM Awas Yojana 2025 Apply Benefits Marathi : प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे, ही एक मूलभूत गरज आणि स्वप्न असते. केंद्र सरकारने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2015 साली सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana – PMAY) ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, निम्न व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना घरासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत माहितीप्रमाणे, आजपर्यंत सुमारे 92 लाख 21 हजार घरांचे वाटप झाले असून, सरकारने या योजनेत आतापर्यंत सुमारे 8.07 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवली आहे. या योजनेतून केवळ घरच मिळत नाही, तर मनरेगा अंतर्गत रोजगार, तसेच मोफत वीज व पाण्याची सुविधाही मिळते. 

आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर आधीपासून पक्के घर नसणे अत्यावश्यक आहे. आर्थिक उत्पन्नाच्या श्रेणींनुसार अर्जदारांची पात्रता ठरवली जाते. EWS (अतिदुर्बल घटक) गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹3 लाखांपर्यंत, LIG (निम्न उत्पन्न गट) साठी ₹3 ते ₹6 लाख, MIG-I (मध्यम उत्पन्न गट – I) साठी ₹6 ते ₹12 लाख, आणि MIG-II (मध्यम उत्पन्न गट – II) साठी ₹12 ते ₹18 लाख इतकी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पिएम आवास योजनेसाठी विशेषतः अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) तसेच इतर मागासवर्गीय महिलांना प्राधान्य दिले जाते. याशिवाय, ज्यांचे उत्पन्न तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे, अशा लाभार्थ्यांनाही प्राथमिकता दिली जाते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रति घर किमान ₹1,20,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते, तर डोंगराळ आणि दुर्गम भागात ही रक्कम ₹1,30,000 पर्यंत वाढवली जाते. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पिएम आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जावे लागते. तेथे राज्य, उत्पन्न श्रेणी, आणि लाभ प्रकार निवडल्यानंतर अर्जदाराला स्वतःबद्दल, कुटुंबाच्या तपशीलांसह, आधार क्रमांक, पत्ता, आणि बँक खाते यांची माहिती भरावी लागते. सर्व तपशील भरल्यानंतर ‘Eligibility Check’ करून अंतिम अर्ज सबमिट करता येतो.

🔴 हेही वाचा 👉 मिळवा दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन; संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे वाचा.

Share This Article