PM Kisan Yojana 2025: २०वा हप्ता कधी जमा होणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोण वंचित राहणार?

2 Min Read
PM Kisan Yojana 20th Installment 2025 Date Eligibility

PM Kisan Yojana 20th Installment Date And Time : देशातील लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर वर्ग केली जाते.

PM किसान योजना 20 व्या हप्त्याची तारीख?

सरकारने आतापर्यंत या योजनेचे १९ हप्ते वितरित केले असून, सध्या देशभरातील कोट्यवधी शेतकरी २०व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील हप्ता जून २०२५ मध्ये जारी केला जाऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि कोण राहतील वंचित?

PM किसान योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी केंद्र सरकारने काही नवीन अटी लागू केल्या आहेत:

  • ई-केवायसी (e-KYC) आणि भूधारणा नोंदींच (land records) सत्यापन आता अनिवार्य करण्यात आल आहे.
  • जे शेतकरी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांच्याच खात्यात पुढील हप्ता जमा केला जाईल.
  • याशिवाय, रजिस्ट्रेशन दरम्यान चुकीची माहिती दिलेल्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC किंवा भूलेख सत्यापन पूर्ण केलेले नाही, त्यांना योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही.

पात्र राहण्यासाठी काय कराव?

पात्र राहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित खालील गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. आधार कार्ड आधारित e-KYC प्रक्रिया.
  2. आपल्या जमिनीच्या मालकीची डिजिटल भूलेख पोर्टलवर अद्ययावत नोंद.
  3. अर्जात दिलेली माहिती तपासून खात्री करणे की ती योग्य आहे.

पिएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याचा (PM Kisan Yojana 20th Installment) लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवणे आणि सत्यापन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी ठरले अपात्र; शासकीय तपासणीत उघड झाली माहिती.

Share This Article