PM Awas Yojana 2025 Maharashtra Beneficiaries Rejected | मराठी योजना .News : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana 2025) या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शहरी भागांतील अर्जांची प्रशासनाकडून तपासणी सुरू असून, अनेक अर्जदार अपात्र ठरत असल्याच समोर आल आहे. सध्या सुरू असलेल्या तपासणीमध्ये अनेक अर्जदारांची आधी पासूनच पक्की घर असल्याच आढळून आल्यान त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तसेच, अनेक अर्जदारांनी वारंवार मागणी करूनही आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने त्यांचे अर्जही लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या सूत्रांनुसार, शहरी भागांतील तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यासाठी २०२३ साली अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी हजारो नागरिकांनी अर्ज सादर केले होते. तपासणीदरम्यान यातील किमान २००० अर्जदार अपात्र ठरले असून, त्यांच्याकडे आधीपासूनच पक्क घर असल्याच आढळून आल आहे.
कागदपत्रे न दिल्यामुळे रद्द होणार अर्ज
PM Awas योजनेंतर्गत अर्ज करताना शासनाने निश्चित केलेली कागदपत्रे आवश्यक असतात. मात्र, अनेक अर्जदारांनी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात आली तरीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे आता त्यांचे अर्ज रद्द करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने यावेळी अर्जदारांना आणखी वेळ न देता थेट पुढील टप्प्यातील अर्जदारांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
हफ्ता घेऊनही घर न बांधणाऱ्यांवर कारवाई
विशेष बाब म्हणजे, योजनेअंतर्गत पहिला व दुसरा हफ्ता मिळूनही काही लाभार्थींनी अजून घराचे काम सुरू केलेले नाही. अशा लाभार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांनी जर लवकरच काम सुरू केल नाही, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई वं त्यांच्याकडून अनुदानाची वसूली करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी भागात लाभ घेण्यासाठी केलेले अर्ज तपासणीच्या प्रक्रियेतून जात आहेत. योग्य कागदपत्रे सादर न करणारे आणि अपात्र अर्जदार वगळले जात आहेत. या प्रक्रियेच्या पारदर्शकतेमुळे खऱ्या गरजूंना घर मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
🔴 हेही वाचा 👉 ५ लाख गुंतवणुकीवर मिळतील १० लाख, सुरक्षित बचतीची खात्री.