Ladki Bahin Yojana New Update: ‘लाडकी बहिण योजना’ संपुष्टात? सरकारने लाखो महिलांना यादीतून वगळल्याचा आरोप

3 Min Read
Ladki Bahin Yojana Maharashtra Beneficiaries Removed Controversy

Ladki Bahin Yojana New Update Today: ‘लाडकी बहिण योजना’ संपुष्टात? सरकारकडून लाखो महिलांना वगळल्याचा ठाकरे गटाचा आरोप

Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi : राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही आता प्रत्यक्षात संपुष्टात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. 

Ladki Bahin Yojana Maharashtra Beneficiaries Removed Controversy : आदित्य ठाकरे यांनी असा दावा केला की, राज्यातील लाखो महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आल असून सरकार त्यांना आधी दिलेली रक्कमही परत घेण्याचा प्रयत्न करत आहे. “जेव्हा सत्ताधारी बहुमत घेऊन सत्तेत आले, तेव्हा त्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक आश्वासनांपैकी एकही योजना पहिल्याच अर्थसंकल्पात समाविष्ट केली नाही,” असा आरोप त्यांनी केला.

“रक्कम कमी होणार? १५०० रुपयांबाबत देखील शंका!”

‘लाडकी बहिण’ योजनेद्वारे महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. पण आता ही रक्कम कमी करून ५०० रुपये करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चाही सुरू आहे. “महायुती सरकारने आधी २१०० रुपये देण्याच आश्वासन दिलं होत, तर आम्ही ३००० रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण आता ही रक्कम १५०० रुपयांवरही टिकेल की नाही यावरच शंका आहे,” अस आदित्य ठाकरे म्हणाले.

“लाखो महिलांना हटवल, पोलिस कारवाईचा इशारा?”

आदित्य ठाकरे यांनी असा दावा केला आहे की, सरकारने लाखो महिलांना योजनेच्या यादीतून वगळल असून काही प्रकरणांमध्ये जमा केलेल्या रकमा महिलांच्या खात्यातून परत घेतल्या जात आहेत. इतकच नव्हे तर काही प्रकरणात पोलिस कारवाई होणार असल्याचही ते म्हणाले.

सरकारकडून स्पष्टीकरण: ‘रक्कम कमी नाही’

दरम्यान, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केल की, लाडकी बहीण योजनेची रक्कम कमी करण्यात आलेली नाही. ज्या महिलांना अन्य योजनेअंतर्गत १००० रुपये मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेतून उर्वरित ५०० रुपये दिले जात आहेत.

राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘लाडकी बहिण’ (Women Welfare Scheme) योजनेभोवती आता मोठा राजकीय वादंग सुरू आहे. सरकारकडून योजनेबाबत स्पष्टीकरण दिल जात असल, तरी विरोधकांचे आरोप आणि महिलांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता ही लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यासाठी चिंतेची बाब आहे.

🔴 हेही वाचा 👉 ‘लाडका शेतकरी’ योजना जाहीर; शेतकऱ्यांना दुहेरी लाभ, प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत.

Share This Article