Bandhkam Kamgar Yojana Registration Benefits Maharashtra : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची कल्याणकारी योजना म्हणजे ‘बांधकाम कामगार योजना’. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे हा आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक लाभ बांधकाम कामगारांना दिले जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार नोंदणी केल्यावर कामगारांना एकूण ३२ हून अधिक योजनांचा लाभ घेता येतो. त्यामध्ये विवाहाच्या खर्चाची भरपाई, आरोग्य उपचारासाठी मदत, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, प्रसूतीसाठी रक्कम, आणि गृहबांधणीसाठी अनुदान यांचा समावेश आहे. शिवाय, MS-CIT सारख्या संगणक अभ्यासक्रमासाठी शुल्क परतावा देखील दिला जातो.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी पात्रतेचे काही निकष आहेत. अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे आणि अर्जदारणे मागील बारा महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे. अर्ज करताना आधारकार्ड, पत्ता पुरावा, कामाचा पुरावा, बँक पासबुक, ओळखपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.
योजनेच्या लाभांमध्ये शैक्षणिक गटासाठी प्रतिवर्ष २,५०० ते १ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक सहाय्य दिले जाते. वैद्यकीय उपचारासाठी गंभीर आजारांवर १ लाख रुपये आणि प्रसूतीसाठी १५,००० ते २०,००० रुपये दिले जातात. नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये २ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद आहे. गृहनिर्माणासाठी शहरी व ग्रामीण भागात प्रत्येकी २ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो. यासाठी mahabocw.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘बांधकाम कामगार: नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून पुढील फॉर्ममध्ये वैयक्तिक, कौटुंबिक, कामकाज व कागदपत्रांची माहिती भरून अर्ज सबमिट करता येतो.
कामगारांसाठी हे एक मोठे आर्थिक आणि सामाजिक संरक्षण देणारे पाऊल असून, योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र बांधकाम कामगारांनी घेणे गरजेचे आहे. शासनाने केलेली ही मदत त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी मोठा आधार आहे.
🔴 हेही वाचा 👉आधार कार्डवरील जुना फोटो बदलायचा आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.