PM Vishwakarma Yojana 2025 Benefits : स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या पारंपरिक व्यवसायाशी संबंधित शिल्पकार आणि कारीगरांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ सध्या देशभरात चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी, विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेतून केंद्र सरकार शिल्पकारांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देते, तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दोन टप्प्यांमध्ये दिले जाते.
PM Vishwakarma योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायांशी निगडीत 18 प्रकारच्या कारीगरांना थेट लाभ दिला जातो. यामध्ये मूर्तिकार, धोबी, टोपली व चटई तयार करणारे कारागीर, राजमिस्त्री, लोहार, कुलूप बनवणारे, नाव तयार करणारे, जाळी (फिशिंग नेट) बनवणारे, झाडू तयार करणारे, चांबार, सोनार, खेळणी तयार करणारे, कपडे शिवणारे, केस कापणारे, तसेच टूलकिट आणि हातोडा बनवणारे शिल्पकार यांचा समावेश आहे. हे सर्व व्यवसाय पारंपरिक असून या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना सरकारकडून आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, आणि व्यावसायिक मार्गदर्शन मिळते.
पिएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेणाऱ्यांना सुरुवातीला टूलकिट खरेदीसाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यानंतर प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो, जेणेकरून लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने स्वावलंबन आणि पारंपरिक कौशल्यांचे संवर्धन यावर भर दिला आहे.
ज्यांचे व्यवसाय वरील प्रकारांमध्ये मोडतात आणि जे अद्याप कोणत्याही औपचारिक व्यवसाय प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले नाहीत, अशा पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे जर आपण कोणत्याही पारंपरिक व्यवसायात कार्यरत असाल, तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकता.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; “२१०० रुपयांच वचन, देत आहेत केवळ ५०० रुपये”.