Ladki Bahin News: लाडकी बहिण योजनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; “२१०० रुपयांच वचन, देत आहेत केवळ ५०० रुपये”

2 Min Read
Nana Patole On Ladki Bahin Yojana 2100 Rupees Promise

Ladki Bahin New Update  : महाराष्ट्रातील महिलांना मोठी आश्वासन देत लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अनेक महिलांच्या खात्यात केवळ ५०० जमा केले जात असल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप करत स्पष्ट केल की, “महिलांना २१०० रुपये देण्याच आश्वासन देऊन फक्त ५०० रुपये खात्यात जमा करण म्हणजे लाडक्या बहिणींची थट्टा आहे.”

“विकासासाठी पैसे नाहीत, हे फक्त एक कारण”

Nana Patole On Ladki Bahin Yojana 2100 Rupees Promise : नाना पटोले म्हणाले, “महिलांना पैसे दिले म्हणून आता विकासासाठी निधी नाही, अस सरकार सांगतय. पण ही वस्तुस्थिती नाही. ही फक्त पळवाट आहे. हे सर्व निवडणुकीपूर्वी लोकांची दिशाभूल करण्यासाठी केल गेल. महिलांचा विश्वासघात करणार हे सरकार आहे.”

अजित पवार व एकनाथ शिंदेंवरही टीका

नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही टीका केली. “सध्या सत्तेत असलेल्या पक्षातील नेते कोण किती निधी घेतो यावरच चर्चा करत आहेत. अजित पवार म्हणतात – ‘मी निधी घेतला, आता तुमच तुम्ही पाहा’. हे स्पष्ट दर्शवत की सरकार जनतेचा पैसा लुबाडण्याच्या कामात व्यस्त आहे,” असा आरोप पटोलेंनी केला.

काँग्रेसला घाबरत आहे भाजप – वाड्रा प्रकरण

रॉबर्ट वाड्रा यांना ईडी नोटीस मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पटोले म्हणाले, “भाजप काँग्रेसला घाबरते. निवडणुका जवळ आल्या की मोदी-शहा यांच ईडी-सीबीआयच राजकारण सुरू होत. पण काँग्रेस घाबरणारा पक्ष नाही. आम्ही सत्तेच्या अत्याचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढू.”

शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित

नाना पटोलेंनी शेतकऱ्यांचे प्रश्नही उपस्थित केले. “भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफी, नुकसानभरपाई दिली जात नाही. जमीन अधिग्रहणासाठी पूर्वी १५ टक्के व्याज दिल जायच, आता केवळ ९ टक्के दिल जात आहे. हा सरळसरळ शेतकऱ्यांवर अन्याय आहे.” अस नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांच्या आरोपांमुळे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आली आहे. महिलांशी केलेल्या वचनपूर्तीविषयी सरकारची भूमिका आता अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे, अस मत काँग्रेसने मांडल आहे.

🔴 हेही वाचा 👉 ७.७४ लाख महिलांना ५०० रुपयांचा फरक; सरकारकडून ७७ कोटी रुपयांची बचत.

Share This Article