Ladki Bahin Yojana April पैसे कधी जमा होणार? Installment Date Maharashtra

2 Min Read
Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra News

Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. राज्यातील करोडो महिलांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत उत्सुकता आहे. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत 9 हप्ते वितरित झाले असून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana April पैसे कधी जमा होणार?

लाडकी बहीण योजनेचे मागील हप्ते विशेष प्रसंगांच्या दिवशी वितरित करण्यात आले होते. उदाहरणार्थ, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते महिला दिनाच्या (8 मार्च) पूर्वसंध्येला लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यातही हा हप्ता कोणत्या शुभमुहूर्तावर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अक्षय्य तृतीयेला मिळणार का पैसे?

एप्रिल महिन्यात अक्षय्य तृतीया हा शुभ सण आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता याच शुभ दिवशी म्हणजेच 30 एप्रिल ला खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अपात्र महिलांचे नाव यादीतून वगळले 

राज्य शासनाकडून योजनेच्या लाभार्थ्यांची सातत्याने तपासणी केली जात आहे. यामध्ये योजना पात्रतेचे निकष न पूर्ण करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून त्यांची नावे यादीतून वगळली जात आहेत. त्यामुळे काही महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana April Installment) 30 एप्रिल रोजी जमा होण्याची शक्यता असून त्यासाठी लाभार्थींनी आपल्या बँक खात्यांची माहिती व अद्यतने तपासावीत. अधिकृत तारीख जाहीर होताच शासनाकडून संबंधित खात्यात थेट पैसे जमा केले जातील.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेत कोणता बदल? अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.

Share This Article