ATM Torn Notes Replacement Process RBI Guidelines : डिजिटल पेमेंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी आजही रोखीचे महत्त्व कमी झालेले नाही. मात्र, अनेक वेळा ATM मधून पैसे काढताना फाटलेल्या, खराब किंवा अतिशय जुन्या नोटा येतात. अशा नोटा दुकानदार किंवा इतर व्यापारी घेण्यास नकार देतात आणि त्यामुळे सामान्य नागरिक अडचणीत सापडतो. पण काळजी करण्याची गरज नाही, कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अशा नोटा बदलण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
फाटलेली नोट म्हणजे नेमक काय?
फाटलेली नोट म्हणजे अशी नोट जिचा काही भाग गहाळ आहे किंवा जी दोनपेक्षा अधिक भागांत फाटलेली आहे. जर नोट अत्यंत खराब, जळालेली किंवा ओळखू न येण्याजोगी असेल, तर ती RBI च्या विशेष प्रक्रियेनुसार बदलली जाते.
जर ATM मधून फाटलेली नोट मिळाली तर काय कराव?
- सर्वप्रथम त्या बँकेच्या जवळच्या शाखेत जा, जिच्या ATM मधून तुम्ही पैसे काढले आहेत.
- एक अर्ज सादर करा, ज्यामध्ये खालील माहिती असावी:
– पैसे काढल्याची तारीख आणि वेळ
– ATM चे ठिकाण आणि पत्ता
– किती रक्कम काढली आणि त्यातील किती नोटा खराब आहेत
- तुमच्याकडे ATM स्लिप असल्यास, ती अर्जासोबत जोडा.
- स्लिप नसेल, तर मोबाईलवर आलेल्या व्यवहाराच्या (transaction) मेसेजची माहिती द्या.
बँक तुमच्या नोटांची तपासणी करेल आणि RBI च्या नियमांनुसार आणि योग्यतेनुसार तुम्हाला नवीन नोटा देईल किंवा ती रक्कम तुमच्या खात्यात जमा करेल.
RBI च्या नियमानुसार:
- कोणतीही बँक फाटलेली किंवा खराब नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाही.
- तुम्ही एका दिवशी जास्तीत जास्त 20 नोटा किंवा 5000 रुपयांपर्यंतची रक्कम कोणतेही शुल्क न देता बदलू शकता.
जर तुमच्याकडे फाटलेल्या, जुनाट किंवा ATM मधून आलेल्या खराब नोटा असतील, तर ताबडतोब संबंधित बँकेशी संपर्क साधा.
🔴 हेही वाचा 👉 महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर; अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक.